पुणे – पुणे शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रके (banners, flex, hoardings) लावून विद्रुपीकरण करणार्‍यांविरोधात महापालिका प्रशासनाने आता अधिकच ‘कठोर’ भूमिका घेतली आहे. अशा बेकायदा जाहिरातींना प्रत्येक फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रकांसाठी (banners, flex, hoardings) एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड न भरल्यास संबधितांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी दिली. दरम्यान, बहुतांश फ्लेक्स राजकीय असल्याने हा दंड खरोखर आकारला जाणार की नाही, ही बाब औत्सुक्याची ठरली आहे.

पुणे शहर आणि परिसरात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस तसेच जाहिरांतींचे बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्ती पत्रके मोठ्या (banners, flex, hoardings) प्रमाणावर लावण्यात येतात. यावर महापालिका कारवाई करून ते काढूनही टाकले जातात.

आकाशचिन्ह विभागाच्या प्रस्तावाला मंगळवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी मान्यता दिल्याची माहिती विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली.

शहरात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, विविध उपक्रम, जाहिरातींचे बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रके (banners, flex, hoardings) मोठ्या प्रमाणावर लावली जातात. यावर महापालिकेतर्फे कारवाई करून ते काढून टाकले जातात.

यापूर्वी आकाशचिन्ह विभागातर्फे अशा बेकायदा बॅनर आणि फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. यामध्ये कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १० फ्लेक्स, बॅनर लावणाऱ्यांविरोधात कारवाई करताना एक हजार रुपये दंड आकारण्यात येत होता.

मात्र, हजार रुपये दंड भरून संबंधित व्यक्ती अनेक फ्लेक्स, बॅनर, भित्तीपत्रके (banners, flex, hoardings) लावत असल्याचे दिसून येत होते.

या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक फ्लेक्स, बॅनर, भित्तीपत्रकासाठी एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या प्रकाराला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे.