पुणे – सण आणि उत्सव आले (diwali 2022) की, गोडधोड पदार्थ घेण्यासाठी लोकांची खरेदी असते. अशातच मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये भेसळ होते. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून दसरा-दिवाळीनिमित्त अन्न तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यात पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ऐन दिवाळीत एक मोठी कारवाई केलेली (seized stock of sweets during diwali) आहे. दिवळीपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने बनावट गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांनी (Sweet Shop) मागवलेला 5 लाख 90 हजार 400 रुपये किंमतीचा गुजरात बर्फीचा (Gujarat Barfi) साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. 17) रोजी अशोक राजाराम चौधरी यांच्या वाहनातून गुजरात बर्फी, स्वीट हलवा, रिच स्वीट डिलाइट, स्पेशल बर्फी अन्न पदार्थांचे सहा नमुने तपासणीसाठी घेत उर्वरित पाच लाख 90 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पुणे शहरातील मंडईतील मे. अग्रवाल स्वीट मार्ट, कोंढवा बुद्रुक मधील मानसरोवर येथील मे. कृष्णा डेअरी फार्म, देहूरोड, गहुंजे येथील मे. अशोक राजाराम चौधरी आणि बालेवाडी येथील हिरसिंग रामसिंग पुरोहित यांनी हा भेसळयुक्‍त मिठाईचा माल गुजरात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथून मागवला असल्याचे आढळून आले.

त्यानंतर या विक्रेत्याकडे त्यांनी मागवलेल्या गुजरात बर्फीचा वापर कशासाठी करण्यात येत होता याबाबत अधिक तपास करून त्याअनुषंगाने संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत असून या अंतर्गत 1 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत मिठाईचे 28, खवा-2, रवा, मैदा, बेसन- 12, खाद्यतेल- 7, वनस्पती/घी- 2, नमकीन- 3 व इतर अन्न पदार्थाचे 16 असे

एकूण 70 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. तसेच खाद्यतेल पॅकिंगसाठी जुन्या डब्याचा पुनर्वापर केल्याचे आढळून आल्याने तीन ठिकाणी 4 लाख 51 हजार 400 रुपये किंमतीचा साठा,

हिरवा वाटाणा- 39 हजार 800 रुपये, मिठाई- 6 हजार 750 रुपये आणि घी /खवा 12 हजार 400 रुपये असा एकूण 5 लाख 10 हजार 400 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.