पुणे – साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला आणि मोठा अपघात झाला आहे. या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच याच नवले ब्रिजवर (Navale Bridge) आणखी एक अपघात झाल्याचे उघड झाले आहे. काल रविवारी सकाळी हा अपघात झाला होता. कुटुंबासोबत पर्यटनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

गाडी मध्ये बसत असताना दुसऱ्या एका गाडीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. योजना शिवशंकर महंत (वय 32, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर चिमूरडा शिवांश महंत हा गंभीर जखमी झाला आहे.

सिंहगड रस्त्या जवळील नवले पुलाजवळ (Navale Bridge) हा दुर्दैवी अपघात झाला आहे. याप्रकरणी अमोल सुरवसे यांनी तक्रार दिली असून अज्ञात कार चालकाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल सुरवसे आणि शिवशंकर महंत हे दोघे कुटुंबासह रत्नागिरी येथे पर्यटनासाठी निघाले होते. रविवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास त्यांची कार नवले ब्रिजच्या पुढे एका हॉटेलसमोर उभी होती.

कारमध्ये बसण्यासाठी ते पायी चालत जात होते. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना अमोल, शिवशंकर व त्यांची पत्नी योजना आणि मुलगा शिवांश यांना जोराची धडक दिली. यात योजना यांचा मृत्यू झाला तर, मुलगा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर चालक तेथून पसार झाला. याघटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सध्या सिंहगड परिसर आणि नवले ब्रिज (Navale Bridge) परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येत आहे,