पुणे – गेल्या आठवडाभरापासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

अश्यातच पुणे (Pune) शहरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील यामुळे निर्माण झाल्याचे दिसून आले. यामुळे अनेक ठिकाणी कार आणि बाइक वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहे.

दरम्यान, आता पुण्यात (Pune) निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवरून सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे.

‘पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवड्यातील धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती.

सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे 125 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरश: वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले.

सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे (Shiv sena) बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेत आहेत’, असा हल्लाबोल शिवसेनेनं (Shivsena) केला आहे.

पुण्यात कोणकोणत्या ठिकाणी साचलंय पाणी?

– येवलेवाडी स्मशानभूमीजवळ
– सुखसागर नगर, अंबामाता मंदिर

– कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड
– रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ

– सुखसागर नगर, डॉल्फिन चौक
– बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र

– हडपसर, गाडीतळ
– शिवाजीनगर पोलिस मुख्यालय

– मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम
– कसबा पेठ, फिश मार्केट जवळ

– कुंभार वाडा समोर
– नारायण पेठ, मोदी गणपती

– औंध, डिएव्ही स्कुल गल्ली
– कसबा पेठ, पवळे चौक

– कसबा पेठ, भुतडा निवास
– पर्वती, मिञमंडळ चौक