पिंपरी – पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) पोलिसांनी पिंपरी गावामध्ये एक मोठी कारवाई केली असून, या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी पोलिसांनी (police) गावामध्ये अचानक छापा टाकून तब्बल ११ लाखांचा गुटखा (gutkha) जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आला आहे. महावीर लिंबाराम भाटी (रा. पिंपरीगाव), सतीश माळी (रा. सांगवी) व धनसाराम (रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी गुन्हे (crime) शाखेचे पोलीस शिपाई सदानंद रूद्राक्षे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सध्या या आरोपींची कसून चौकशी होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी गावातील विद्यानिकेतन शाळेच्या रस्त्यावर मोकळ्या मैदानात एका वाहनात गुटखा, सुगंधी सुपारी असा ११ लाख १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल विक्रीसाठी आणण्यात आला होता.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक राजन महाडिक पुढील तपास करत आहेत.

सध्या पुणे शहर आणि इतर परिसरात गुटखा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, पोलीस अधिकारी या विक्रेत्यांवर मोठी कारवाई करताना दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील येरवडा येथील रामवाडी परिसरात छापा टाकून तब्बल पावणे चौदा लाखांचा गुटखा जप्त केला होता. ही कारवाई पोलिसांनी (Police) शुक्रवारी (दि. २८) केली. सवाराम लाबुराम देवासी (वय ९ रा. कोंढवा मुळराहणार राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.

सवाराम लाबुराम देवासी हा येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात टेम्पो मधून गुटखा वाहतूक करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. करणाऱ्या टेम्पो चालकाला येरवडा पोलिसांनी पकडले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लाख ८७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.