पुणे – येरवडा पोलिसांनी (Yerawada) रामवाडी परिसरात एक मोठी कारवाई केली असून, या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) रामवाडी येथून सुमारे पावणे चौदा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी (Police) शुक्रवारी (दि. 28) केली. सवाराम लाबुराम देवासी (वय 9 रा. कोंढवा मुळराहणार राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.

सवाराम लाबुराम देवासी हा येरवड्यातील (Yerawada) शास्त्रीनगर चौकात टेम्पो मधून गुटखा वाहतूक करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. करणाऱ्या टेम्पो चालकाला येरवडा (Yerawada) पोलिसांनी पकडले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 लाख 87 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, देवासी कोंढवा भागातून गुटखा घेऊन नगर रस्त्यावरुन वाघाेलीकडे निघाला होता. येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो निघाल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी टेम्पो अडवला. टेम्पोची पाहणी करण्यात आली. तेव्हा गोण्यांमध्ये गुटख्याचे पूडे आढळून आले. पोलिसांनी 13 लाख 87 हजार 880 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र आळेकर, एकनाथ जोशी, सोमनाथ भोरडे, आनंदा भोसले आदींनी ही कारवाई केली.

पोलीस अमंलदार सोमनाथ भोराडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुटखा घेऊन एक टेम्पो शास्त्रीनगर चौकाकडून पुणे-नगर मार्गाने जाणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी चौकीजवळ सापळा रचला व टेम्पो चौकासमोर येताच टेम्पो चालक व टेम्पोला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.