पुणे – चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (chaturshringi police station) दोन पोलीस (police) कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २५ हजारांची लाच घेताना रविवारी सायंकाळी पकडले. लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाहीत. दोघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई (crime) करण्यात आली.

चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या (chaturshringi police station) अंतर्गत असलेल्या ओैंध पोलीस चौकीतील दोन पोलिसांनी एकाकडे २५ हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

आणि त्यानंतर रविवारी सायंकाळी सापळा लावून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले असून, या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार प्रशांत जाधव व पोलिस शिपाई अजित गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. जाधव व गायकवाड हे दोघेही चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

दरम्यान, तक्रारदाराच्या आतेभावावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात तडजोडी झाल्यानंतर २५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

त्यानुसार, रविवारी सायंकाळी दोन्ही पोलिसांनी रक्कम घेऊन तक्रारदारास बोलावले होते. मात्र तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार, रविवारी सायंकाळी चतु: शृंगी पोलिस ठाण्यात सापळा लावून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.

दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.