पुणे – शहरात (Pune News) आज एक धक्कादायक प्रकार घडला असून, या घटने मुळे सामान्य पुणेकरांच्या (Pune News) मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एका तरूणाने पी. एम.पी.एम.एल. बस (PMT) चालकाला (bus driver) अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण (Crime) केल्याची घटना पिंपरी चिंचवड भागात घडली. बसच्या आडवी येणारी दुचाकी काढायला सांगितली म्हणून या तरुणाने थेट बसमध्ये चढून चालकाला बेदम मारहाण (Crime) केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ (video) चांगलाच व्हायरल झाला आहे. आज सकाळी पिंपरीतील (pimpri chinchwad) नेहरू नगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगपालिकेचा बस ड्रायव्हर सूर्यकांत कांबळेना मारहाण केल्यानंतर तरुण पसार झाला. ऋषिकेश घोडेकर असं या तरुणाचे नाव असून, तुला माहित आहे का, मी कोण आहे ? असं म्हणत किरकोळ वादातून या तरुणाने बस मध्ये प्रवेश करत बस चालकाला बेदम मारहाण केली आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे चालकाला मारहाण होत असतांना कंडकटर आणि इतर प्रवासी केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे या व्हिडिओ बद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या बसमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओची चर्चा संपते तोवर पुन्हा पीएमटीचा दुसरा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी वाचवा मला वाचवा ड्रायव्हरपासून मला वाचवा अशाप्रकारे आरडा ओरडा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, आज झालेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये उलटी परिस्थीती पाहायला मिळत आहे.

पुणे शहर आणि परिसरात अश्या प्रकारच्या घटना मोठ्या संख्येने वाढत असून, पोलीस प्रशासनाने या मध्ये लक्ष घालून अश्या तरुणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.