पुणे – पुणे मनपा (Pune) व पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) मनपा क्षेत्रातील रेडझोन (red zone) बाबत नागरिकांचे मध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र रेडझोन मध्ये येते याची कोणतीही माहिती नागरिकांचे कडे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) हद्दीतील काही भागात असलेल्या रेड झोनचे (red zone) नकाशे व सर्व्हेची माहिती तात्काळ प्रसिद्ध करण्याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (dr neelam gorhe) यांनीलेखी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

यामुळे नागरिकांना त्यांची घरे विक्री करता येत नाहीत, मालमत्तावर कर्ज घेता येत नाही,जमीन विकसीत करता येत नाही तसेच जुन्या बांधकामांचा पुनर्विकास ही करता येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये घबराट ही आहे.

याविषयी डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती, विधान परिषद यांना आणि शिवसेना पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांना सतीश मरळ, शिवसेना विभागप्रमुख यांनी निवेदन दिले आहे. यामध्ये विशेष लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यावर शिवसेनेच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे.

‘या’ प्रमुख मुद्द्यांवर भर दिला :

१) निगडीतील सर्वे नंबर ५६,५७ व ६३ हे रेड झोन मध्ये येत असताना या सर्व्हे नंबर मधील शरदनगर मध्ये SRA प्रकल्प सुरू झाला आहे.

याला जिल्हाधिकारी पुणे यांनी हे क्षेत्र रेड झोन मध्ये येत नाही असे पत्र दिले आहे. त्यामुळे कोणते क्षेत्र रेड झोन मध्ये व कोणते क्षेत्र बाहेर आहे याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.

२) या शरदनगर मधील रेड झोन मध्ये रेनबो डेव्हलपर यांना परवानगी कशी दिली गेली याबाबत ही चौकशी होणे आवश्यक आहे.

३) तसेच पिंपरी चिंचवड भागातील यमुनानगर,त्रिवेणीनर, चिखलीतील मोरे वस्ती, साने चौक हे रेड झोन क्षेत्रामध्ये येते का ? याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.