पुणे – साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना अदा करण्याच्या दोन तुकड्यातील एफ.आर.पी.चा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एफ. आर. पी. एकरकमी करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने (swabhimani shektar sangathan) च्या वतीने आज दुपारी साखर संकुल पुणे (pune news) येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी राज्य भरातून शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी पुण्यातील वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (raju shetty) यांनी सरकारला इशारा देखील दिला. “सरकारने वेळीच कणखरपणा दाखवला नाहीतर, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असं ते म्हणाले.

काय म्हणाले? राजू शेट्टी वाचा…

शेट्टी (raju shetty) म्हणाले, सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, व सरसकट हेक्टरी 50 ह़जारांची मदत करा अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची ही लढाई आहे.

ठरविक मागण्या मान्य करून पुढील लढाईसाठी तयारी करायची असते. महाविकस आघाडी सरकारने अन्यायकारक दोन ट्प्यांमध्ये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे, तो या सरकारने रद्द करावा अशी आमची मागणी आहे.

15 ऑक्टाेबर राेजी आम्ही ऊस परिषद घेऊन राज्यसरकारकडे विविध मागण्या केल्या. आतापर्यंत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय हाेता परंतु महाविकास आघाडी सरकारने दाेन टप्प्यात शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा निर्णय घेतला.

शिंदे -फडणवीस सरकारने मागील सरकारच्या काळातील सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा लावला असल्याने त्यांनी शेतकरी हिताचा हा निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे.

त्यामुळे साखरेची 3100 रुपये प्रती क्विटल भावास 200 रुपये अधिकचे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्यात यावे मागणी आहे. साखर उद्याेगाला चांगले दिवस असल्याने आम्ही एफआरपीपेक्षा वाढीव पैसे मागत आहे.

परंतु त्याबाबत सरकार, साखर कारखाने गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. मात्र, सरकार दुटप्पीपणाने वागत आहे. मागील वर्षभरात साखरेला चांगला भाव मिळालेला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखरे शिवाय इथेनाॅल वाढविण्यास प्राधान्य देऊन त्यास ही प्राेत्साहनात्मक चांगला भाव दिला गेला आहे ताे कारखान्यांना मिळाला आहे. या यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.