पुणे – एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या नेत्या दिपाली सय्यद या अखेर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची घोषणा केली. यावेळी दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी संजय राऊत (sanjay raut) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर थेट हल्ला करत आगामी वाटचालीचे संकेत दिले.

यावेळी दिपाली सय्यद (Deepali Sayyad) म्हणाल्या., “मी एवढंच सांगेन की, संजय राऊत यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत.

त्यांच्यामुळे शिवसेनेते दोन गट पडले. शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत शिंदे साहेबांसोबत उभे राहणे, हे माझे कर्तव्य.” असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले.

यावेळी दिपाली सय्यद यांनी आश्चर्यकारकरित्या रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. “मुंबई महानगरपालिकेतून येणारे खोके बंद झाले, याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर नेत्या आहेत.

या सगळ्यातील महत्त्वाच्या सूत्रधार या रश्मी ठाकरे या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप केला जातो. पण मुंबई महानगरपालिकेतील खोक्यांचं राजकारण नक्की काय आहे, त्यामागील सूत्राधार कोण आहे, या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत, असं त्या यावेळी म्हणाल्या होत्या.

दरम्यान, आता दिपाली सय्यदविरोधात (Deepali Sayyad) ठाकरे गटाचे कार्यकर्ते आग्राम झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच पुण्यात (Pune) अभिनेत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर नेत्या दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे यांच्या बद्दल विधान केले. त्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे.

यावेळी ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी दिपाली सय्यद यांच्या प्रतिमेला जोडे मारले. दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे, संजय राऊतांवर टीका केली होती. शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या दिपाली सय्यदविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं.

पुण्यातील (pune) डेक्कन येथील गुडलक चौकात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून दिपाली सय्यद यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.