मुंबई – करोनानंतर यावर्षी सर्वत्र दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाचं आयोजन करण्यात आले असून, सगळी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव होत आहे. अश्यातच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दहीहंडीचा समावेश खेळामध्ये केला आहे. तसेच, शिंदे सरकारने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास दहा लाखांचा विमा कवच देण्याची घोषणा सुद्धा केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी काल विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या व्यतीरीक्त दहीहंडी (Dahi Handi) खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत देखील प्राधन्य दिले जाणार आहे.

तसेच, राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी (Dahi Handi) स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) सांगितलं आहे.

मात्र, आता त्यांच्या निर्णयाला पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला आहे.

राज्यात हजारो विद्यार्थी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. यश मिळेपर्यंत विद्यार्थी प्रयत्न करत राहतात. आपल्याला सरकारी नोकरी मिळेल अशी आशा विद्यार्थ्यांना असते.

या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. अनेक वर्ष सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या या विद्यार्थांचा प्रश्न आधी मार्गी लावावा.

त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधींनी केली आहे. हा निर्णय मागे न घेतल्या रस्त्यावर उतरु असा इशारा देखील विद्यार्थी प्रतिनीधींनी दिला आहे.

गोविंदांसाठी विमा कवच :

दहीहंडीमध्ये (Dahi Handi) सहभागी झालेल्या गोविंदांना विमा कवचही मिळणार आहे. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विम्याबाबतचा निर्णय फक्त या वर्षीसाठी लागू असेल.