पुणे – पुणे शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रके (banners, flex, hoardings) लावून विद्रुपीकरण करणार्‍यांविरोधात महापालिका प्रशासनाने आता अधिकच ‘कठोर’ भूमिका घेतली आहे. अशा बेकायदा जाहिरातींना प्रत्येक फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रकांसाठी (banners, flex, hoardings) एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड न भरल्यास संबधितांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

आणि त्या अंतर्गत आता पुणे शहरात मोठी कारवाई झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील गेल्या पाच दिवसांत ४३६ फ्लेक्स, २६ होर्डिंग्ज, ९२५ बोर्ड, ४३२ बॅनरवर (banners, flex, hoardings) कारवाई केली.

यात अनधिकृत होर्डिंग्ज दीड लाख; तर बोर्ड, बॅनर यांच्याकडून ५२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे शहराचं विद्रुपीकरण करत असून, शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.

महापालिका हद्दीत फ्लेक्स, होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर (banners, flex, hoardings) लावण्यासाठी परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, शहरात परवानगी न घेताच अनधिकृतपणे जाहिरातबाजी सुरू आहे.

यात राजकीय पक्ष, स्थानिक नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याप्रमाणेच विविध स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्थाही पुढे आहेत. परिणामी महापालिकेच्या आर्थिक नुकसानीबराेबरच शहराचे विद्रुपीकरण देखील होत असल्याचं यातून दिसून येत आहे.

आजवर प्रति १० जाहिरातींमागे एक हजार रुपये दंड केला जात होता. मात्र, राजकीय दबावापोटी ना दंड वसूल होत होता, ना कारवाई केली जात होती. शहरात जानेवारी महिन्यात जी-२० आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.

त्यापूर्वी शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आणि अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम लावण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रति जाहिरात एक हजार रुपये दंड वसूल करण्यास मान्यता दिली आहे, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत.

आदेशानंतरही अपेक्षित कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला कारवाईचा दैनंदिन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

पुणे शहर आणि परिसरात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस तसेच जाहिरांतींचे बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्ती पत्रके मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात.

त्यामुळे फ्लेक्सबाजी (banners, flex, hoardings) करून शहर विद्रूप केले जात असल्याचं दिसून येत आहे. असं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होत.