पुणे जिल्ह्यात खासगी सावकाराने मदतीने इंदापुरातील निमगाव केतकी येथील २७ वर्षीय युवकाचे पैशासाठी अपहरण केले व पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्याला युवकाला जिवंत जाळल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली आहे.

आरोपींना तात्काळ अटक

दरम्यान ह्या युवकाचा मृत्यू झाल्याने आरोपींना तात्काळ अटक केली असुन त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर) असे मयत इसमाचे नाव आहे.

चारचाकी वाहनात बसवत अपहरण

याबाबत सविस्तर वृत्त असे कि ७ जुन २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता वरील आरोपींनी फिर्यादीला पाठीमागुन बंदुक लावुन, चारचाकी वाहनात बसवत त्याचे अपहरण केले होते.

Advertisement
पेट्रोल टाकून जिवंत पेटवुन दिले !

व्यवहारातील बाकी पैसे आहेत असे म्हणून १३ दिवस अज्ञातस्थळी एका खोलीत डांबुन ठेवले. दि.२० रोजी वरील आरोपींनी फिर्यादी शिवराज उर्फ शिवराम हेगडे याला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवुन दिले आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.

तीन दिवसांपासून सुरु होते उपचार

फिर्यादीच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तिथे त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. त्यादरम्यान फिर्यादीने पोलिसांना लेखी जबाब दिला आहे.

आरोपींना अटक !

उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाल्याने इंदापूर पोलिसांनी आरोपीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. नवनाथ हणुमंत राऊत (वय३२, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) व सोमनाथ भिमराव जळक (वय३१, रा.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

Advertisement