पुणे – कात्रज परिसरात (katraj ghat) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची घटना घडत आहेत.कात्रज घाट परिसरात देखील तिसऱ्यांदा दरड कोसळली. नुकतीच कात्रज (katraj ghat) जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याची (katraj ghat) घटना घडली. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक याठिकाणी रवाना झाले. त्यांच्याकडून रस्त्यांवरील दगडे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांनी दिली आहे.

डोंगरावरून चार ते पाच मोठे दगड खाली आले होते. त्यापैकी दोन दगड रस्त्याच्या मधोमध होते. सुदैवाने यामध्ये कोणताही अपघात झाला नाही.

मात्र, काही काळासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता देवेन मोरे यांनी दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली असून ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी आणखी काही मोठे दगड मोकळे झाले असून ते काढणे गरजेचे आहे.

अन्यथा रात्री-अपरात्री पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे नमूद केले. घटना घडल्यानंतर महापालिका आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभाग घटनास्थळी जाऊन अडथळा बाजूला करून वाहतूक सुरळीत करतात.

वनविभागडोकावूनही पाहत नाही. मात्र दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून आपत्ती पूर्वी उपाययोजना का केल्या जात नाहीत.

दुर्घटनेत एखाद्या निष्पाप वाहन चालकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.