पुणे – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

काल (दि. 6) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारला आहे.

दरम्यान, आता शिंदे गट (Chief Minister Eknath Shinde) आणि भाजपाच्या सरकारने कामाला सुरुवात केली असून अनेक जुन्या निर्णयांबद्दल शिंदे सरकाराने पुन:विचार, आढावा घेण्याचं काम सुरु केलं आहे.

अगदी जिल्हा विकास निधी रोखण्यापासून ते महाविकास आघाडीच्या काळात बाजूला सारण्यात आलेल्या योजनांना पुन्हा गती देण्यासंदर्भातील निर्णय शिंदे सरकारने घेतले आहेत.

तसेच, स्थानिक स्वराज्यसंस्थांमधील निवडणुकींसंदर्भात घेण्यात आलेले निर्णय लागू करण्याची मागणी केलीय. यामध्ये प्रामुख्याने संरपंच आणि

नगराध्यक्षांची निवड पुन्हा थेट जनतेमधून करण्याची तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत.

शिंदे सरकारच्या या निर्णयावर आता पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आपलं मत व्यक्त करत एक आव्हान (Vasant More Challenges) देखील केलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

वसंत मोरे (Vasant More) म्हणत, “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार”, असं म्हणत मोरे (Vasant More) यांनी एक ट्विट केलंय.

पुढे ते म्हणतात, “माझे सरकारला एक आव्हान आहे. हिंमत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच असेल’. असं ते म्हणाले आहे.