आळंदी – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा (rain) सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, काही जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. तर पिंपरी चिंचवड परिसरातही जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत असून,

लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील 48 तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने

इंद्रायणी नदीकाठच्या (indayani river) गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

लोणावळा धरणात जलाशय पातळी 623.98 मीटर झाली असून पाणीसाठा 7.11 द.ल.घ.मी. (6.47 टक्के) आहे.

विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी (indayani river) नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये.

नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

तर संपूर्ण आठवडाभर पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून इंद्रायणी (indayani river) उगमस्थान तथा मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

परिणामी इंद्रायणी (indayani river) नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणीचे दोन्ही बाजूंचे घाट पाण्याखाली गेले आहेत.