पुणे – सध्या राज्यतील (maharashtra) अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, काही जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. तर पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) परिसरातही जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत असून, लोणावळा धरण देखील पूर्ण भरून वाहू लागले आहे.

तर दुसरीकडे खडकवासला धरणसाखळी (khadakwasla dam) प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे एकत्रित साठा 16 टीएमसीपर्यंत वाढला आहे.

त्यामुळे शहराची वर्षभराची गरज भागण्याइतरा साठा जुलैच्या मध्यापर्यंत झाला आहे. पुणे महानगरपालिका (PMC) खडकवासला धरणातून दर महिन्याला सुमारे 1.25-1.5 टीएमसी पाणी घेते.

सध्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांमध्ये 29.15 टीएमसी एवढी सामूहिक साठवण क्षमता असून सध्या ते 54.7% भरलेली आहेत. त्यामुळे आता नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे.

खडकवासला येथील जलसाठा शुक्रवारी 1.97 टीएमसी इतका होता, तर पानशेत आणि वरसगाव येथील जलसाठा त्यांच्या संबंधित क्षमतेच्या 55% आणि 51% इतका वाढला.

तर दुसरीकडे टेमघरचा साठा 1.5 टीएमसी असून 3.7 टीएमसीच्या एकूण साठवण क्षमतेच्या 40%पर्यंत पोहोचला आहे.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे आता सामान्य पुणेकरांची पाण्याची चिंता दूर होणार हे नक्की.

दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार, सध्या तरी खडकवासला (khadakwasla dam) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जलाशयातून मुठा नदीत पाणी सोडण्याचे काम सुरूच आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी कमी झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला जाईल. असं देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.