पुणे : येथील चाकणमध्ये (Chakan) ८५ हजारांची लाच (Bribe) घेताना एका व्यक्तीला पुणे लाचलुचपत विभागाने (Pune Bribery Division) रंगेहात पकडले आहे. चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) आलेल्या तक्रारीवरून तक्रार (Complaint) दाखल न करण्यासाठी ही लाच घेण्यात येत होती.

पुणे लाचलुचपत विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दि. २९ ही कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचाही (Sub-Inspector of Police) समावेश आहे.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (Sub-Inspector of Police Somnath Zende) यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

तर लाच स्वीकारणाऱ्या अख्तर शेखावत अली शेख (Akhtar Shekhawat Ali Sheikh) (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

२७ वर्षीय याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तरुणाच्या तक्रार आली होती. तक्रार दाखल न करण्यासाठी त्याच्याकडे ८५ हजारांची लाच मागण्यात आली होती.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी त्यांच्यासाठी ७० हजारांची लाच मागितली होती. तर आरोपी शेख याने त्याच्यासाठी १५ हजारांची लाच मागितली होती.

Advertisement

लाचलुचपत विभागाने सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाच्या उपधीक्षक क्रांती पवार (Kranti Pawar, Deputy Superintendent of Bribery) करत आहेत.