पुणे – पुण्यातील वाहतूक कोंडी (Pune Traffic) टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेला बीआरटी (BRT) मार्ग बंद करणार नाही, पुण्यातील वाहतूकीसाठी बीआरटीमार्ग (BRT) महत्वाचा आहे. अनेक रस्त्यांवर बीआरटी वाहतूक सुरळीत सुरु असते, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बीआरटी बंद ठेवणार नाही, असं महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी विविध मार्ग सुचवले होते. त्यात बीआरटी (BRT) मार्ग बंद करण्याचं पत्र महापालिकेला दिलं होतं. त्यानुसार बीआरटी मार्ग बंद करण्यात येणार होते. मात्र या निर्णयाला पीएमपीएमएलने विरोध दर्शवला आहे.

सध्या पुण्यात वाहतूक कोंडीवरुन (Pune Traffic) लेटर वॉर सुरुच आहे. पीएमपीएमएल आयुक्तांनी बीआरटी बंद करु नका, या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते.

काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी बीआरटी (BRT)मार्ग बंद करा, अस पत्र पालिकेला दिले होते. या पत्राला पीएमपीएमलने विरोध केला आहे.

बसेसच्या आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील वाहतूक सुरळीत आणि जलद होण्यासाठी शहरातील काही मार्गावर फक्त बीआरटी बस मार्ग (BRT route) सुरु करण्यात आले.

असून त्यासाठी रस्त्यातील मध्य भागातून स्वतंत्र असा रस्ता पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमार्फत तयार करण्यात आलेला आहे.

या बीआरटी बस मार्गावर परिवहन महामंडळामार्फत शहराच्या विविध भागाकडे प्रवाशांना येण्या-जाण्यास सोयीचे होण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवास होण्याकरता बसेसचे संचलन सुरु ठेण्यात आलेले आहे. त्यामुळे हे बंद होणार नाही. असं त्यांनी सांगितलं आहे.

हतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी सेवा सुरू करण्यात आली असली तरी शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या वाहतूक कोंडीचे खापर महापालिकेवर फोडले होते.