पुणे – गेल्या दोनवसांपूर्वी नाशिक येथे घडलेल्या बसच्या दुर्देवी घटनेत तब्बल 11 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, अन्य राजकीय नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली. दरम्यान, नाशिक बस दुर्घटनेची (Nashik Bus Fire) घटना ताजी असतानाच आता आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ही घटना पुण्यातून समोर आली असून, या घटनेमुळे उडाली आहे.

पुणे (pune dist) जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस (Pune Bus Fire) पेटली. या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक (Pune Accident News) झालीय.

सुदैवानं या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही. मात्र भरस्त्यातच या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. MH 05 DK 9699 क्रमांकांची ही बस होती.

आग लागलेली खासगी बस ही भीमाशंकर इथं जाणारी होती. एका खासगी कंपनीची ही बस असून कंपनीचं नाव कळू शकलेलं नाही. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ या बसने पेट घेतला. या बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, या बसमध्ये नेमकी आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही. शॉर्ट सर्टिकमुळे या बसने पेट घेतला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. बसमध्ये लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झालंय.

मात्र, बसमध्ये आग लागतेय हे पाहून प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. बस रस्त्याच्या एका कडेला उभी करण्यात आली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. आणि सर्वच जण सुखरूप बचावले आहे.

नाशिक बस दुर्घटना…

मिरची चौकात खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट (Nashik Bus Fire) घेतला. या भीषण अपघाताने तब्बल 11जणांचा जीव घेतला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. ही आग इतकी भयंकर होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.