पुणे – प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी व ई-वाहनांचा (CNG and e-vehicle uses) वापर वाढला पाहिजे असा सांगितलं जात. पुण्यात (pune) जवळपास दोन लाख सीएनजीवर (CNG) धावणारी वाहने आहेत. पेट्रोल व डिझेल (petrol diesel) च्या तुलनेत सीएनजीचे दर कमी आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारक आपले वाहन सीएनजीवर रूपांतरित करीत आहे. मात्र त्यांना आता पश्चतापाची वेळ आली आहे. होय.. याच कारण देखील तसेच आहे.

पुणे शहरात (pune) सीएनजीची वाटचाल शंभरीकडे होत असून पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

MNGLने वाढवलेल्या दरानुसार शहरात सीएनजीच्या एका किलोसाठी 91 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता सीएनजीच्या किंमती पेट्रोल-डिझेलच्या किंमतीला गाठणार हे निश्चित झाले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढीनंतर आता सीएनजीच्या किंमती वाढल्यामुळे वाहन चालक चांगलेच हैराण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहरात आज एका किलोसाठी तब्बल 91 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता, त्यामुळे वाहन चालकांना एका किलोसाठी 87 रूपये द्यावे लागत होते,

पण आता पुन्हा या दरात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीची शंभरीकडे वाटचाल झाली आहे.

कशी होत गेली दरवाढ :

जानेवारी – 66 रुपये

फेब्रुवारी – 68 रुपये

मार्च – 73 रुपये

एप्रिल – 77.20 रुपये

मे – 80 रुपये

जून – 82 रुपये

जुलै – 85 रुपये