पुणे – प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी व ई-वाहनांचा (CNG and e-vehicle uses) वापर वाढला पाहिजे असा सांगितलं जात. पुण्यात (pune) जवळपास दोन लाख सीएनजीवर (CNG) धावणारी वाहने आहेत. पेट्रोल व डिझेल (petrol diesel) च्या तुलनेत सीएनजीचे दर कमी आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारक आपले वाहन सीएनजीवर रूपांतरित करीत आहे. मात्र, आता सीएनजी संदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे.

सीएनजी (CNG) दरात वाढ झाली आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात (CNG Price Hike) वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी दरात (Pune CNG Price Hike) प्रति किलो मागे एक रुपयांची दरवाढ झाली आहे.

त्यामुळे पुण्यात आता सीएनजी (CNG) 92 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत.

मागील महिन्यातच सीएनजी गॅसच्या दरात चार रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक रुपयाची दरवाढ करण्यात आल्याने दोन महिन्यात पाच रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सामान्य पुणेकरांना याचा चांगलाच फटका बसणार असून, वाहनचालकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच नवे दर लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे शहर आणि परिसरात CNGच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली.

मात्र, आज झालेल्या दरवाढीनंतर सीएनजीच्या दराने डिझेलचा दर गाठला आहे. डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरात फक्त 36 पैशांचा फरक राहिला आहे. पुणे शहरात पेट्रोल 105.54 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर, डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे.

सीएनजी दरवाढीचा फटका पुण्यातील सामान्य वाहन चालक, रिक्षा चालकांना अधिक बसणार आहे. आधीच महागाईचा मार बसत असताना आता दुसरीकडे दरवाढीने खिशाला कात्री बसणार आहे.