पुणे : जिल्यातील आणि शहरातील कोरोनाची वाढती (Increasing Corona) रुग्णसंख्या (Corona Patients) पाहता पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. पुण्यातील शाळांबाबत म्हणत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील शाळा (Pune School) सध्या तरी बंद होणार नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर पुण्यात नवी नियमावली (New rules) लागू करण्यात येईल असेही महापौरांनी (Mayor) सांगितले आहे.

पुण्यात (Pune) काल ५२४ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. तसेच एकट्या पुण्यात ओमिक्रॉनचे (Omicron) ३६ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे.

या बैठकीत शाळांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. याचा आढावा आम्ही घेतला आहे. २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान शहरात चौपट रुग्ण संख्या वाढली आहे असेही महापौर म्हणाले.

त्यामध्ये जवळपास रोज ८० ते ६५ टक्के दोन्ही डोस घेतलेले लोक कोरोना बाधित होत आहेत. त्यांना सौम्य लक्षणे असली तरी दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना पण कोरोना होत आहे.

Advertisement

त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. २५०० कोरोना रुग्णांपैकी ३४६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. बाकी रुग्ण ठीक असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पालकमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी बैठक होणार असून या बैठकीत आणखी काही कोरोना नियम करता येतात का यावर निर्णय होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, प्रशासन पूर्ण पणे सज्ज आहे. ४ हजार रेमडीसीवीर उपलब्ध आहेत. १८०० बेड आणि एका मिनिटाला ९५०० लिटर ऑक्सिजन तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Advertisement