Pune – पुणे जिल्ह्या प्रशासनाची आज कोरोना आढावा बैठक पार पडली. बैठकीतील चर्चेअंती अजून आठ दिवस कोरोनाची आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे.(ajit Pawar deputy Cm)

त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. झालेल्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारहोते.

Advertisement

कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून ही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. कोरोना बाबतच्या नियमावलीचा निर्णय घेत असताना आम्ही सर्वाना विचारात घेतो असा टोलाही त्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे, याबरोबरच जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 51 टक्केमुलांचे लसीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटनालाही परवानगी, नियम पाला नाहीतर…

जिल्ह्यातील सिंहगड, भीमा शंकरला येथे पर्यटकांना जाता येणार आहे. या पर्यटना स्थळाजवळील दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेण्याद्री आणि अष्ट विनायकाला भाविकांना परवानगी देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. मात्र गर्दी झालयास निर्बंध लावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Advertisement

कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेत आहे हे सांगण्याबरोबरच शहरातील कोरोनाच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रकही लवाकरच जाहीर केलं जाणार आहे. शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.

Advertisement