पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात देशात करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील 24 तासात देशात 1 हजार 190 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

आत्तापर्यंत देशातील एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या ही 4 कोटी 46 लाख 55 हजार 828 वर पोहोचली आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 16 हजार 243 वर आली आहे.

तर आत्तापर्यंत देशात करोनामुळं 5 लाख 30 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

सध्या देशात करोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 16 हजार 243 वर आली आहे. जी एकूण प्रकरणांच्या 0.04 टक्के आहे. गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 हजार 375 ने घट झाली आहे.

त्याचवेळी, रुग्णांचा बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा 98.78 टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 9 हजार 133 लोक करोनातून बरे झाले आहेत.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.
3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा
4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.
5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे
6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.