पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आज करोना संसर्गाच्या 286 नवीन रूग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद झाली आहे. तर, 313 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

रूग्णांच्या निधनाबाबत जाणून घ्यायचे झाल्यास राज्यात आज एक करोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात करोना रूग्णांच्या संख्येबाबत जरी दिलासादायक माहिती असली तरी मात्र एक्सबीबी व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.

राज्यात आतापर्यंत एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 79,81,854 रुग्ण करोना मुक्त होऊन घरी परतले असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे.

तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत करोनाची एकूण रुग्णसंख्या ही 1,48,386 इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या 1505 करोनाचे सक्रिय रूग्ण आहे.

यामध्ये मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 527 सक्रिय रूग्ण आहेत. तर पुण्यात 296 करोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सक्रिय रूग्णांच्या संख्येत घट होत आहे.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.
3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा
4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.
5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे
6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.

दरम्यान, करोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा एकदा निर्बंध घातले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास करोना वाढणार नाही असं सुद्धा आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे.