पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये (Corona Update) देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य (Ministry of Health) विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, करोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णचा काल मृत्यू झाला नाही.

आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 3 लाख 72 हजार 443 जणांना आज पर्यंत करोनाची लागण झाली. सध्या 143 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.

त्यातील 137 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, 6 रुग्ण महनगरपालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. तसेच, दिवसभरात 366 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात करोना रूग्णांच्या संख्येबाबत जरी दिलासादायक माहिती असली तरी मात्र एक्सबीबी व्हेरिएंटने चिंता गेल्या काही दिवसांपासून वाढवली आहे.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा

4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.

5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे

6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.

दरम्यान, करोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा एकदा निर्बंध घातले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास करोना वाढणार नाही असं सुद्धा आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे.