Abs 2019-nCoV RNA virus - 3d rendered image on black background. Viral Infection concept. MERS-CoV, SARS-CoV, ТОРС, 2019-nCoV, Wuhan Coronavirus. Hologram SEM view.

पुणे : कोविड १९ (Covid 19) नंतर राज्यात आणि देशात शाळा, महाविद्यालये हळूहळू सुरु होत असतानाच पुण्यामधून (Pune) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील एका महाविद्यालयात (college) कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

कोथरूडमधील (Kothrud) नामांकित एमआयटी महाविद्यालयात (MIT engineering college) कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. एमआयटीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात ओमिक्रॉनचे (Omicron)सावट असताना कोरोना रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याचे समोर आले आहे.

Advertisement

चिंता वाढवणारी बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यातच भर म्हणून शहरातील कोथरूडमध्ये असणाऱ्या MIT कॉलेजमध्ये एकाच वेळी १३ नवे रुग्ण सापडले आहेत.

या विद्यार्थ्यांचा (MIT students) कोणता व्हेरिेएंट आहे याबाबत अजून अहवाल आलेला नाही. मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या १३ विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे समोर आले आहे. हे विद्यार्थी तिसऱ्या वर्षात शिकत आहेत.

महत्वाचे म्हणजे दोन डोस दिलेल्या विद्यार्थ्यांना कॉलजमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतरही लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. का राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करण्यासाठी हे विद्यार्थी एकत्र जमले होते.

Advertisement

विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्यासाठी स्क्रिनिंग केले जाते. यावेळी एका विद्यार्थ्याचे टेंपरेचर जास्त असल्याने त्याची चाचणी करण्यात आली. यावेळी अन्य विद्यार्थ्यांनाही लागण झाल्याचे समोर आले आहे.