file photo

पुणे : शहरातील आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) वाढत असतानाच लोणावळ्यात (Lonawala) विनापरवाना पिस्तूल (Unlicensed pistol) बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) २ जणांना अटक (Arrest) केली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या (Lonavla Rural Police Station) हद्दीत बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रशांत शांताराम आंबेकर (रा. देवले, मावळ), अनिकेत अशोक कालेकर (रा. काले, पवनानगर, मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

Advertisement

पोलिसांना माहिती मिळाली होती की, मळवली व देवले परिसरात एक तरुण विनापरवाना पिस्तूल बाळगत संशयास्पद फिरत आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.

त्यानुसार पोलिसांनी मळवली देवले रस्त्यावर (Malwali Devale Road) सापळा रचून प्रशांत आंबेकर याला ताब्यात घेतले आहे.

यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. पिस्तूलाबाबत विचारले असता त्याने अनिकेत कालेकर याने हे पिस्तूल दिले असल्याची माहिती दिली.

Advertisement

पोलिसांनी अनिकेत कालेकर यालाही अटक केली आहे. दोघांना वडगाव मावळ न्यायालयाने (Wadgaon Maval Court) शनिवारपर्यंत (ता. १) पोलिस कोठडी (Police cell) सुनावली आहे.