पुणे : पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून २ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणीसह ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (Animal Husbandry Officer) डॉ. शिवाजी विधाटे (Dr. Shivaji Vidhate) (वय ५६, रा. पिंपळे निलख) यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती.

खंडणी प्रकरणी नेहा आयुब पठाण (वय २५, रा. कात्रज कोंढवा), मेहबुब आयुब पठाण (वय ५२) आणि आयुब बशीर पठाण (वय ५५, दोघेही रा. अकलुज, ता. माळशिरस) अशी पोलिसांनी (Police) अटक केलेल्यांची नावे आहेत.

वरील आरोपींनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (Animal Husbandry Officer) यांच्याकडे खंडणी मागितली होती. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात (Army Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार सादर आरोपी तरुणी ही जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन विभागात ऑपरेटर म्हणून नेमणुकीला आहे. या तरुणीने तिचा हात पकडला, अश्लिल बोलले अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) यांच्याकडे केली होती.

याबाबत तरुणीला सर्वांसमोर विधाटे यांनी विचारणा केल्यानंतर खोटी तक्रार दिल्याचे मान्य केले होते. त्यानंतर या तरुणीने पुन्हा तक्रार असल्याचे सांगितले. त्यामुळे विधाटे यांनी या प्रकरणाची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.

पशुसंवर्धन अधिकारी विधाटे यांना गुरुवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांना नेहा पठाण (Neha Pathan) पोलिसांत तक्रर देणार असल्याचे सांगितले. प्रकरण प्रकरण मिटवायचे असेल ५ लाख रूपये देण्याची मागणी केली.

Advertisement

५ लाखावरून कमीजास्त करत २ लाख रुपये सकाळी देयचे ठरले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch Unit) दोनचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil), सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे (Assistant Inspector of Police Prakash More) यांनी खंडणी घेताना आरोपींना रंगेहाथ पकडण्याची योजना आखली.

पैसे घेतल्यानंतर तिघांना पकडण्यात आले. त्यावेळी तरुणीसोबत असलेले दोघेजण तिचे आई-वडील असल्याचे समोर आले आहे. तर, फोन करणारी व्यक्ती ही तिचा भाऊ होता. पोलिसानी तिघांना खंडणी घेताना रंगेहाथ पकडले आहे.

Advertisement