पुणे – पुण्यात (Pune) एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याच्या साह्याने वार करून खून (murder) करण्यात आला. दरम्यान, ही घटना पुण्यातील खडकवासला (khadakwasla) परिसरात मंगळवारी सकाळी घडली आहे. हा खून पुर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांचे (Pune Police) म्हणणे आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात (khadakwasla) एकच दहशद निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऋषिकेश तांबे (वय 30,रा. गोळेवाडी, डोणजे, पुणे) असे खून (murder) झालेल्या इसमाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी खडकवासला धरणाच्या संरक्षक भिंती जवळून ऋषिकेश तांबे हा त्याचे दोन साथीदार करण दारवटकर आणि रोहन पवार यांच्या सोबत दुचाकीवरुन जात होता.

त्यावेळी त्याचा कारने पाठलाग करत असलेल्या टोळक्याने धरणाच्या संरक्षक भिंतीजवळ दुचाकीस धडक देऊन थांबवले. दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर पडल्यानंतर कार मधून आरोपी खाली उतरुन आरोपींनी त्यांच्या जवळील कोयत्याने सपासप ऋषिकेश तांबे याच्या डोक्यात, चेहऱ्यावर वार (murder) केले.

त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या रोहन व करण यांचे 23, रा. धायरी, पुणे) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हवेली पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खुन झालेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. इतर दोघेजण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे आहे.

याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हवेली पोलीस करत आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील पुणे शहरात आणि इतर परिसरात या प्रकारचे हल्ले झाल्याचे पाहण्यास मिळाले असून, या दहशदीमुळे सामान्य नारिकांच्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलीस अश्या गुंडांवर कोणती कारवाई करणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.