Shattered brown beer bottle resting on the ground: alcoholism concept - toned image

पुणे : दारू (Alcohol) पिल्यावर दारुड्यांना भान राहत नाही याची आज प्रचिती आली आहे. महिलेने (woman) वाटेत मद्यपान (Alcoholism) करू नका म्हणल्याचा राग आला आणि चक्क महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या (Young) डोक्यात बिअरची बाटली (Beer bottle) फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सौरभ संजय डोंगरे, अमित देवकर, रोहित देवकर अशी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा (Crime) दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमनी (Siddharth Laxman Kattimani) (वय २९) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Advertisement

तक्रारदार (Complainant) आणि त्यांची मावशी महालेनगर (Mahalenagar) येथे त्यांच्या भाडेकरूंकडे भाडे मागण्यासाठी जात होते.

त्यावेळी दारुडे रस्त्यावर मद्यपान करत बसले होते. फिर्यादीच्या मावशीने त्यांना सांगितले की इथे दारू पित बसू नका. असे म्हणल्यावर दारुड्यानी फिर्यादीच्या मावशीला शिवीगाळ (Swearing) केली.

आरोपी रोहित देवकर याने असे म्हणल्याचा राग आला आणि फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी केले.

Advertisement

या घटनेचा अधिक तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक उकीर्डे (Assistant Police Inspector Ukirde) करत आहेत.