पुणे : शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात एक धक्कादायक (Shocking) प्रकार घडला आहे. महिलेला बनावट फेसबुक अकाउंट (Facebook Account) वरून बदनाम (Notoriety) करून तिला आत्महत्या (Sucide) करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे.

महिलेसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical contact) ठेवून बलात्कार (Rape) केल्याच्या प्रकरणात आरोपीला अटक (Arrest) झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर आरोपी तरुण महिलेला त्रास देत असायचा.

त्यानंतर त्याने बनावट फेसबुक अकाउंट बनवून महिलेची बदनामी केली आणि तिलाच आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. समीर बाळू निकम (रा. जिजाऊ बिल्डींग, नर्‍हेगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

Advertisement

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आरोपी तरुणाविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. ३१ वर्षीय पीडित महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार (Complaint) दिली आहे.

पीडित महिलेने या अगोदर आरोपी समीर याच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा महिलेला त्रास देईल सुरुवात केली.

फेसबुक वर बनावट अकाउंट तयार करून पीडित महिलेची बदनामी करायचा आणि तिला त्रास देईचा. ”मी आता तुमची इज्जत घालवून टाकणार आणि तुझ्या पत्नीला मारुन टाकणार आहे.

Advertisement

जर तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे. तुम्ही मला मारुन टाका, नाही तर मी स्वत:च आत्महत्या करतो आणि तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून तुम्हाला अडकून टाकणार.

मी तुम्हाला त्रास देणार आणि तुमची बदनामी करणार” अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector of Police Jadhav) करत आहेत.

Advertisement