पुणे : शहरात चोरीचे (Theft) प्रमाण अधिक वाढले आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchvad) शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. चोरटयांनी एक दोन नवे तब्बल ३३४ गाड्या (Vehicles) चोरून नेल्या आहेत.

विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालयाच्या (Commissionerate of Police) हद्दीतूनच ३३४ वाहनांची चोरटयांनी चोरी केली आहे. यामध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी अशा वाहनांचा समावेश आहे.

चोरी गेलेल्या ३३४ वाहनांपैकी पोलिसांनी (Police) २४४ वाहनाचा शोध लावला आहे. तसेच चोरट्यांकडून पोलिसांनी १ कोटी ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरीमध्ये दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे.

Advertisement

पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २४४ दुचाकी चोरीला गेल्या होत्या त्यापैकी २११ दुचाकींचा शोध पोलिसांनी लावला आहे.

हे चोरटे वाहने चोरी करण्यासाठी जास्त वर्दळीची ठिकाणे शोधतात आणि त्याठिकाणाहून वाहने चोरी करतात. घरासमोर आणि पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्या चोरीला जात आहेत.

Advertisement