पुणे – पुणे शहरात (pune police) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एक मोठी कारवाई केली असून, या कारवाई अंतर्गत तब्बल 35 जनांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे (pune) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या धनकवडीतील (dhankawde) दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (police raid) छापा टाकला. धनकवडीतील (dhankawde) फाईव्ह स्टार सोसायटीच्या परिसरात सराईत गुंड जुगार अड्डे चालवित होते.

पोलिसांच्या माहिती नुसार, धनकवडीतील (dhankawde) फाईव्ह स्टार सोसायटीच्या परिसरात गुंड सुनील निर्मळ दोन वेगवेगळे जुगार अड्डे चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (pune police) मिळाली.

आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण माहिती गोळा करून, याठिकाणी पोलिसांच्या पथकाने तेथे अचानक छापा (police raid) टाकला. यावेळी पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतलं आहे.

Advertisement

तसेच, या कारवाई अंतगर्त तब्बल नऊ हजार 70 रुपयांची रोकड, 16 मोबाइल संच, जुगाराचे साहित्य असा एक लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार अड्ड्याचा मालक निर्मळ याचा पोलिसांकडून शाेध घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या

मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राणे, चव्हाण, इरफान पठाण, माने, साबळे आदींनी ही कारवाई केली.

Advertisement

दरम्यान, यापूर्वी देखील धनकवडी भागात पोलिसांनी ‘कॅफे सायक्लोन’ (Cafe Cycl-On) बार व हुक्का पार्लर या हॉटेलवर कारवाई केली होती.

सरस्वती कॉम्प्लेक्स मधील ‘कॅफे सायक्लोन’ छापा टाकत ही कारवाई केली होती. यावेळी घटनास्थळावर 11 हुक्कापॉट्स, चिलीम व

वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ व इतर साहित्य असे एकुण 47,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

Advertisement

‘कॅफे सायक्लॉन’ (Cafe Cycl-On) बार व हुक्का पार्लरचे मालक केतन किसन तापकीर (वय 26), कुणाल किसन तापकीर (वय 29), बार व्यवस्थापक अभिषेक दत्तात्रय जगताप (वय 22) यांना ताब्यात घेतलं होत.