पुणे – गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी (milk) त्यांना ऑक्‍सिटोसीन हे औषध (drugs) दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी (pune police) काहीदिसांपूर्वी उघडकीस आणला होता. ऑक्‍सिटोसीन या औषधांचा साठा करुन तो शहर, जिल्ह्यासह राज्यभरातील गाई, म्हशींच्या मालकांना विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी बेड्या (pune crime) ठोकल्या.

यावेळी पुणे पोलिसांचे (pune police) अंमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल ५३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा ऑक्‍सिटोसीन औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी लोहगाव येथील कलवडी वस्ती येथे शनिवारी (दि.५) केली. या कारवाईत पोलिसांनी समीर कुरेशी (रा. उत्तर प्रदेश), बिश्वजित जाना, मंगल गिरी, सत्यजीत मोन्डल, श्रीमंता हल्दर (सर्व रा. पश्चिम बंगाल) यांना अटक केली आहे.

दरम्यान, बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधाची विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून अटक केली.

बाबूभाई उर्फ अल्लाउद्दीन लस्कर (रा. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजित सुधांशु जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदिनीनपूर,

पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोन्डल (वय २२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि

श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपूरकूर, मंडाल, २४ परगाना, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली होती. लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आरोपी ऑक्सिटॉसीन ओैषधाची निर्मिती करत होते.