पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) अधिकच वाढत चालले आहे. डेक्कन जिमखान्यामधील (Deccan Gymkhana) स्पा सेंटरमध्ये (Spa center) एक धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. तरुणीच्या मानेचा मसाज करताना लज्जास्पद (Shameful) कृत्य केले आहे.

स्पा सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने हा प्रकार केला आहे. या प्रकरणी २६ वर्षीय तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) तक्रार दिली होती. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

मंदार साळुंखे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा (Debauchery) गुन्हा दाखल केला आहे. फर्ग्युसन रोडवरील (Ferguson Road) हेअर आर्ट या स्पा सेंटरमध्ये हे घटना घडली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २६ वर्षीय तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट (Hair art) येथे गेली होती. तेथे काम करणारा मंदार साळुंखे हा कर्मचारी तिच्या मानेचा मसाज करीत होता.

त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला. तसेच अंगाला जाणीवपूर्वक नको तेव्हा हात लावून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

या सर्व प्रकारानंतर २६ वर्षीय तरुणीने पोलीस ठाणे घाटत विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (Assistant Police Inspector Kamble) तपास करीत आहेत.

Advertisement