पुणे : आजकालचा जमाना हा सोशल नेटववर्किंगचा (Social network) आहे. त्यामुळे अनेकांना फसवले जाते. अशीच पुण्यात (Pune) एक धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. पोलिसानेच (Police) वकील असणाऱ्या महिलेवर बलात्कार (Rape) केला आहे.

मेट्रोमोनियल (Metromonial) साईटवर महिला वकील (Women lawyers) आणि एका पोलिसांची ओळख झाली होती. पोलिसाने महिलेला लग्न करू असे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध (Physical contact) ठेवले.

लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण मुळ रा. लोणी काळभोर) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. याच्यावर चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturungi police) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

आरोपी पोलीस सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या (Pune Rural Police Force) एटीएस सेलमध्ये काम करत आहे.

याप्रकरणी २९ वर्षीय वकील महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturungi Police Station) तक्रार (Complaint) दिली आहे.

महिला वकील आणि आरोपी पोलीस यांची मार्च २०२० मध्ये मेट्रोमोनियल ( या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने वकील महिलेचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी ओळख वाढवून जवळीक साधली.

Advertisement

महिलेला लग्नाचे आमिष दाखवून देहुरोड पिंपळे निलख येथील लॉजवर (Lodge) घेऊन गेला आणि त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले.

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. पीडित महिलेने आरोपीने फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement