पुणे : शहरात गुन्हेगारीचे (Crime Rate)प्रमाण वाढत चाललेले आहे. प्रशासनाने यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. मुलीचा वाढदिवस(Daughter’s birthday) साजरा करण्यासाठी हॉटेल मध्ये (Hotel) गेलेल्या वडिलांना (Daughter father) आणि त्यांच्या मित्राला मारहाण (Beating) करण्यात आली आहे.

हॉटेल मॅनेजर (Hotel manager)  आणि कामगारांनी लाथाबुक्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना हॉटेल स्पाईस गार्डनमध्ये (Hotel Spice Garden) घडली आहे. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार (Report to police station) दिली आहे.

या फिर्यादीवरून हॉटेल स्पाईस गार्डनचे मॅनेजर विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन आणि इतर १५ ते १६ कामगारांवर मारहाणीचा गुन्हा (Crime) कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (मुलीचे वडील) त्यांची मुलगी आणि त्यांचा मित्र असे मिळून मुलीचा वाढदिवस साजरा (Bithday celebration) करण्यासाठी हॉटेल स्पाईस गार्डन येथे गेले होते.

वाढदिवस साजरा केल्यानंतर ते जेवण करत असताना हॉटेलचा मॅनेजर त्यांच्या पशी आला आणि त्यांच्याकडे बघून म्हणाला किती उशीर झाला जेवण करताय, पैसे कधी देणार असे म्हणून टोमणा मारला.

जेवण झाल्यावर तक्ररदाराने ऑनलाईन पैसे (Online money Transfer) पाठवण्याचा प्रयत्न केला पण पैसे काही गेले नाहीत. त्यावरून त्यांना फुकटे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि हॉटेल बाहेर हाकलून दिले.

Advertisement

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड (Sub-Inspector of Police Rathore) घटनेचा अधिक तपास करत आहेत.