पुणे – अन्न व औषध प्रशासन (Food and Drugs) कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात दोन ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 4 हजार 600 रुपये किमतीचा साठा जप्त (crime) करण्यात आला आहे. पुणे कार्यालयास प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगाने मे. शिवम पान शॉप, रामटेकडी पुणे आणि मे. अमिना जनरल स्टोअर्स, गायकवाड सोसायटी राम टेकडी पुणे 13 या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, या घटने अंतगर्त दोन जणांना अटक (crime) देखील करण्यात आली आहे.

यादरम्यान, या प्रकरणात दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस (Pune Police) ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल दिला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन करण्यात येत असून,

नागरिकांनी अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

पुण्यातून 30 लाख 37 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा केला जप्त…

दरम्यान, मागील आठवड्यात पुणे विभागात सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला (gutkha panmasala) आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती.

पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी येथील मे. मुकेश सुपर मार्केट येथे विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, व्ही. एन सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 1 लाख 20 हजार 129 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

मालक मुकेश कुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी बावधन येथील मे. नरेंद्र ट्रेडर्सचे मालक गोविदराम प्रजापती यांच्याकडून सुमारे 23 हजार 350 रुपये किमतीचा साठा जप्त करून त्यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली.