पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यामध्ये एक धक्कदायक (Shocking) प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl) जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी (Manchar police) गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार (Complaint) दिली आहे.

तुषार तुळशीराम फुटाणे (वय २३, रा. थोरांदळे) याच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीने मुलीला फसवून तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न या आरोपीने केला आहे.

Advertisement

आरोपी (Accused) तुषार फुटाणे याने आपण दोघे लग्न करू व बाहेर कोठेतरी निघून जाऊ. असे म्हणून तिला गाडीवर बसवून पळवून चास (ता. खेड) येथील त्याच्या मावशीच्या घरी नेले.

तेथे ता. २६ डिसेंबर रोजी तिच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्थापित केले. याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिस निरीक्षक सतीश होडगर (Police Inspector Satish Hodgar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार (Sub-Inspector of Police Rupali Pawar) पुढील तपास करत आहेत.

Advertisement