पुणे : एक ४८ वर्षीय महिलेची फसवणूक (Cheating) करून पोलीस अधिकाऱ्यांविरोधात (Police officers) तक्रार (Complaint) दाखल करायला सांगत तिच्याकडे ५० लाख (5 million) रुपये मागितल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये (Pune) घडली आहे.

शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (crime branch) युनिटने माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील आल्हाट (RTI activist Sunil Alhat) याला बुधवारी रात्री अटक केली आहे.

त्याच्यासह चौघाविरुद्ध दिलेल्या तक्ररीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (shivajinagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

तक्रारदार या कोथरूड (Kothrud) परिसरात राहत असून त्यांच्या पतीविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) तक्रार दाखल आहे.

याच तक्रारीबाबत महिलेने आल्हाट याच्याशी संपर्क साधला होता, त्यावेळी त्याने महिलेला आपली पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख आहे.

आत्तापर्यंत 32 पोलिसांना निलंबित केले आहे, तुमचे पैसे 8 दिवसात मिळवून देतो असे आरोपीने फिर्यादीला म्हणाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

असे सांगत महिलेचा विश्वास मिळवत आरोपीने महिलेला पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांच्याविरुद्ध लेटर हेडवर तक्रार देण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादीने आरोपीच्या सांगण्यानुसार तक्रार दिली.

आरोपीने फिर्यादी महिलेकडे ५० लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुम्हाला अडकवून टाकेन अशी धमकीही दिली.

आरोपीच्या साथीदारानी ही फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सुनील आल्हाट, सुभाष उर्फ अण्णा जेउर, निलेश जगताप व विवेक कोंडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement