पुणे – पुण्यातील (pune) टिळक रोडवरील जोंधळे चौकात काही तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी (Fighting) पाहायला मिळाली आहे. यावेळी तब्बल 10 ते 12 तरुणांकडून एका तरुणाला जबर मारहाण (Fighting) करण्यात येत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला असून, पुण्यातील गुन्हेगारीवर (Pune crime) कोणाचा वचक राहिला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या महाणामारी दरम्यान एका तरुणाने चक्क हातात दगड घेऊन डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाहायला मिळाले. अशाप्रकारे भररस्त्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळक्याकडून करण्यात आला आहे.

मात्र, या हाणामारीचं कारण अद्याप स्पष्ट झालं असून, या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी (pune police) गुन्हेगारांना अटक केली आहे.

एकूण सात जणांवर कारवाई (Pune crime) करण्यात आल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की जोंधळे चौकात दहा बाराजण एका तरूणाला बेदम मारहाण करताना करत आहे.

तसेच त्यातील एक तरुण आपल्या हातात भला मोठा दगड घेऊन डोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे. तर बाकी तरुण त्याला बेदम चोपत आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील पुणे शहर आणि परिसरात अश्या प्रकारच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण होत आहे.

तर, शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर कोणाचा वचक राहिला आहे की नाही? असा सवाल याठिकाणी विचारला जात आहे.