पुणे : शहरातील  हाय स्ट्रीट (High street) जवळील पाठशाळा (School) परिसरातून एका ४ वर्षाच्या मुलाचे (4 year old boy) अपहरण (Abduction) करण्यात आले आहे. तेव्हापासून स्वर्णवचा (Swarnav) शोध सुरु आहे.

स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. स्वर्णव ला घरी दुग्गू नावाने ओळखले जायचे. ११ जानेवारी रोजी अपहरण केल्याची घटना घडली आहे. तेव्हापासून त्याचा शोध सुरु आहे.

भाजपचे (BJP MLA) आमदार महेश लांडगे यांनी अपहरणकर्त्याचे फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत काही माहिती मिळाल्यास ती शेअर करण्याची विनंती केली होती.

Advertisement

स्वर्णव च्या वडिलांनी आता फेसबुक (Facebook Post) वर एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यामुळे सर्वजण हळहळून गेले आहेत. त्यांनी पोस्टद्वारे मागाल ते देतो पण माझा मुलाला परत द्या अशी कळकळीची विनंती केली आहे.

पोस्टमध्ये त्यांनी लिहले आहे की, माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला कृपया फोन करु नका, कधी झाले, कसे झाले, अपहरण वगैरे वगैरे.. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल, तर प्लीज फोन करा.

ज्या कोणी त्याला नेले आहे, मला माझा मुलगा परत द्या, फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ, प्लीज आम्हाला फोन करा, अशी विनंती सतीश चव्हाण यांनी फेसबुकवरुन केली आहे.

Advertisement

माझ्या मुलाला क्रोसिन डीएस सस्पेन्शन हेच कफ सिरप आवडते, त्याला ताप असल्यास हे द्या असेही सतीश चव्हाण यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.