पुणे : शहरातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे २ आठवड्यांपूर्वी योगेश जगताप (Yogesh Jagtap murder) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) करत होते.

या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांना मोठे यश आले आहे. योगेश जगताप यांचा खून करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांची ४ पथके रवाना झाली होती.

या कारवाई दरम्यान आरोपी (Accused) व पोलीस यांच्यात चकमक उडाल्याची घटना घडली आहे. या चकमकीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Advertisement

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशही (Commissioner of Police Krishna Prakash) या कारवाईच्या पथकामध्ये असल्याची माहिती आहे.

आरोपी आणि पोलिसांच्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी किरकोरळ जखमी झाला आहे. या खुनातील आरोपींचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत होते. पोलिसांना आरोपी चाकण मधील कुरवंडी गावात असल्याची माहिती मिळाली.

आयुक्तालयातील (Commissionerate) चार पथकांनी लगेच हालचाली करून सापळा रचत आरोपीना पकडण्याची कारवाई केली असता मुख्य आरोपी गणेश मोटे (main accused Ganesh Mote) आणि अश्विन चव्हाण (Ashwin Chavan) आणि त्याचा साथीदारांनी पोलिसांवर केली फायरिंग सुरु केली.

Advertisement

पोलिस पथकाला आरोपींना पकडण्यात यश आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी 4 पिस्तुल तीन जिवंत काडतुस आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.