पिंपरी : पती मारहाण व छळ करतो म्हणून पत्नीने साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार देहूगाव (Dehugaon) परिसरात घडला असून आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आकाश गोरखे (Akash Gorkhe) होते. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आकाश गोरखे याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होती. त्याबाबत देहूरोड पोलीस (Dehuroad Police) तपास करीत होते.

आकाश अशोक गोरखे, असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी ज्योती आकाश गोरखे (वय १९), (Jyoti Gorkhe) तिचे साथीदार सोनी उमेश जेगरे (वय ३१), रवी धनू राठोड (वय २९, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisement

त्यांच्यासह अक्षय लोंढे (रा. जाधववाडी, चिखली), राम विजय महोतो (रा. पटणा, बिहार), यांच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १२) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांनतर तपासादरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी अक्षय, राम आणि साहिल यांनी ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजता आकाश गोरखे याला देहूगाव कमान येथून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले होते.

तिथे आरोपींनी आकाश याला मारहाण करून त्याचा खून केला. व खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

Advertisement

याप्रकरणी पोलिसांनी पत्नी ज्योती व तिचे साथीदार सोनी आणि रवी या तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील (Senior Inspector of Police Varsharani Patil) तपास करीत आहेत.