पुणे : शहरातील कस्तुरी चौकात (Kasturi Chowk) एका १४ वर्षीय अल्पवयीन (Minor) मुलीचा शाळेत जात असताना फ्रेंडशीपची (Friedndship) मागणी करण्याकरता हात पकडल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे.

शुभम कैलास दारवटकर (वय २२) असे अल्पवयीन मुलीचा हात पकडलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. खडक पोलिसांनी (Khadak Police) आरोपी तरुणाला अटक (Arrest) केली आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) तक्रार (Complaint) दिली आहे.

Advertisement

यानुसार पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. फ्रेंडशीपची (Friedndship) मागणी करत आरोपी तरुणाने भररस्त्यात मुलीचा हात पकडला होता.

हा आरोपी तरुण गेल्या २ आठवड्यापासून मुलीच्या मागे लागला होता. शाळेत येत जात असताना तिला फ्रेंडशीप करण्यासाठी त्रास देत असायचा. तसेच येत जात तिझाकडे एकटक बघत असायचा.

आरोपी शुभम याने अल्पवयीन मुलगी कस्तुरी चौकातून जात असताना तिचा पाठलाग करत मागे आला आणि तिचा हात पकडत मै तुम से फ्रेंडशीप करना चाहता हू, तूम मुझसे फ्रेंडशीप करो असे म्हणाला.

Advertisement

या घटनेची माहिती मुलीच्या भावना समजली. मुलीच्या भवानी आरोपी तरुणाचा शोध घेत त्याला बेदम मारहाण केली आहे. हाताने, लाथाबुक्क्या मारत आरोपी तरुणाला जखमी केले.

खडक पोलिसांनी आरोपी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीच्या भावांविरोधात आरोपी तरुणाच्या सांगण्यावरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement