पुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. काहीदिवसांपूर्वीच शहरातील कोंढवा परिसरात एक गुन्हा घडल्याचं दिसून आलं होत. मात्र, ही एक घटना ताजीसतनाच कोंढवा परिसरातून पुन्हा एकदा हत्येचा थरार उघडकीस आला आहे.

सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली असून, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. एका सराईत गुन्हेगाराचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आलाय.

कोंढवा येथील अशोक सोसायटी जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नागरिक दहशदीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुमित उर्फ मोन्या काकासाहेब जाधव (रा शिवनेरी नगर, गल्ली न 15 ,रिलायन्स टॉवर) असे खून झालेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित उर्फ मोन्या हा सराईत गुन्हेगार होता.. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तो अशोका म्यूज सोसायटी जवळील कचरा डेपो समोरुन जात असताना,

अज्ञात आरोपीने त्याच्यावर सपासप कोयत्याने वार केले. या घटनेत सुमित याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, पोलीस (Pune Police) अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहे.

दरम्यान, सध्या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढले असून, लवकरच या गुन्हेगारीला आलं बसावा अशी भावना सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.