पुणे – पुणे शहर आणि जवळील परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) कमी होताना दिसत नाही. तर, दिवसागणित पुण्यात (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. अशातच पुणे शहरात (Pune Crime) एक धक्कादाय घटना घडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अश्यातच, शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे (Crime) शाखा युनिट चारने एका तरुणास अटक केली आहे. ही कारवाई काल शुक्रवारी (दि. ११) दुपारी ताथवडे येथे करण्यात आली. अभिषेक अमीरदास यादव (वय २३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई सुखदेव गावंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक हा डांगे चौक ते ताथवडे रोडवर ताथवडे येथे शस्त्र घेऊन थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली.

त्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कारवाई करून पोलिसांनी अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपये किमतीचा कोयता आढळून आला. पोलिसांनी कोयता जप्त करत अभिषेक याला अटक केली.

घटनेचा अधिक तपस वाकड पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत.

पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक तलवार भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज परिसरातील एका बेकरीत बसलेल्या व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजारांची रोकड आणि ३ मोबाइल असा ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना १ नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात असलेल्या न्यू मार्शल बेकरीत घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.